छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धविहाराला अतिक्रमित असल्याचे सांगत दिलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येणार आहे. बुद्धविहार विद्यापीठाच्या जागेवर नसून गावठाणात आहे, त्यामुळे आंबेडकरी समुदायाने या नोटीसीला विरोध केला आहे. समन्वयक गौतम खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुद्धविहाराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह अन्य मागण्या मान्य करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल. शहरातील शाळांना खबरदारी म्हणून सुटी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्य मागण्या:
- विपश्यना केंद्राला बौद्ध सर्किटमधून निधी मिळावा.
- हर्सल टी पॉइंट येथे गौतम बुद्धांचा पुतळा बसवावा.
- चिकलठाणा विमानतळाला अजिंठा नाव द्यावे.
शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*