घरबसल्या पैसे कमवण्याचे आमिष दाखवत, एका सायबर भामट्याने शहरातील रोहिणी नावाच्या गृहिणीची तब्बल २५ लाख ७२ हजार ९७८ रुपयांची फसवणूक केली आहे. रोहिणी यांना टेलिग्राम अॅपवर नर्मदा नावाच्या अकाऊंटवरून पार्ट-टाईम जॉबसाठी संदेश आला होता, ज्यात हॉटेल बुकिंगचे टास्क पूर्ण करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्याची संधी असल्याचे सांगण्यात आले.
सुरुवातीला रोहिणी यांनी टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना काही प्रमाणात पैसे मिळाले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी आणखी मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. मात्र, नंतर सायबर भामट्यांनी परतावा थांबवला आणि वेगवेगळी कारणे देत त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले.
फसवणूक लक्षात येताच रोहिणी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*