शहरातली एचडीएफसी बँकेच्या शाखेतील एका बँक अधिकाऱ्याने शेतकऱ्यांसह पाच खातेधारकांना तब्बल 46 लाख 20 हजार रुपयांचा फसवणुकीचा धक्का दिला आहे. या अधिकाऱ्याने मित्रांकडून घेतलेली उधारी चुकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यांमधून पैसे परस्पर वळते केले असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष जयवंत नगराळे असे आरोपीचे नाव असून, तो एचडीएफसी बँकेच्या बीड बायपास रोडवरील शाखेत ब्रँच सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्याने शेतकऱ्यांच्या खात्याशी संलग्न मोबाइल क्रमांक खोटी माहिती देऊन बंद केला आणि नंतर खात्यातील तब्बल 30 लाख 50 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते केले.
ही फसवणूक उघड झाल्यानंतर संबंधित खातेधारकांनी बँकेला माहिती दिली. त्यानंतर बँकेने चौकशी सुरू केली असता नगराळे याने केलेली आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला. त्याने मित्रांकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी या फसवणुकीचा मार्ग निवडला असल्याचे तपासातून समोर आले आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि या प्रकारामुळे खातेधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*