छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी (५ ऑक्टोबर) पोलिस आणि महापालिका प्रशासनाने अश्लीलतेच्या अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २९ कॅफेंवर धाड टाकण्यात आली, जिथे कॅफेंच्या आडून नियमबाह्य प्रकार सुरू होते. पोलिसांनी ग्राहक म्हणून या कॅफेंमध्ये प्रवेश केला आणि खात्री केल्यानंतर लगेच कारवाईला सुरुवात झाली. या पथकाला अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या, जसे की तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत आढळले. काही कॅफेसमोर वेटिंगसुद्धा होती.
अनेक जागरूक नागरिक आणि पालकांनी या कॅफेंविरोधात तक्रारी केल्या होत्या, ज्यामुळे ही कारवाई घडवून आणली गेली. ३० कॅफेंची आणखी यादी तयार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. रेल्वे स्टेशन, अजबनगर, औरंगपुरा, उस्मानपुरा, वेदांतनगर, दशमेशनगर, कोकणवाडी या भागातील कॅफेंवर पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.
पोलिस आणि महापालिकेने ५० अवैध कॅफेंची यादी तयार केली होती, आणि यापुढे अशा कॅफेंवर लक्ष ठेवले जाईल, जेणेकरून ते पुन्हा सुरू होणार नाहीत. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कारवाई झालेली काही कॅफे:
ड्रॉप आऊट, एके ४७, एमएच २०, हॉलिडे, फ्रेंडस, रेनबो, सेव्हन वंडर, हाइड अँड सीक, रॉयल डे, मूनलाइट, वुडीज, मी आणि तू कॅफे-१, ब्लश, इलू, रोझवूड इत्यादी.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*