Oplus_131072

राज्यात बनावट व बोगस औषधांचा महाघोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) करण्याची मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच या प्रकरणी पोलीस महासंचालक आणि सीआयडी प्रमुखांना पत्र पाठवले आहे.

बनावट औषधांचा पुरवठा राज्यभरात

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील औषधांचे नमुने तपासणीत निष्क्रिय व बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाचणी अहवाल येईपर्यंत २५,९०० गोळ्यांचे वितरण झाले होते. चार कंपन्यांकडून तब्बल ८५ लाख बनावट गोळ्यांचे वाटप राज्यभरात झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

घोटाळ्याची व्याप्ती मोठी

कोल्हापूर येथील मे. विशाल एंटरप्रायजेसने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला ३३ प्रकारच्या औषधांचा पुरवठा केल्याचे उघड झाले आहे. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांना आणि मेडिकल स्टोअरला अशा बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची शक्यता आहे.

बॉम्बे मार्केटचा झपाट्याने वाढलेला व्यवसाय

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, बॉम्बे मार्केटमधील औषध विक्रीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. औषधांच्या अत्यल्प किंमतीवर जादा दराने एमआरपी लावून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही औषधे मानवी शरीरासाठी घातक असून त्यांचा कोणताही औषधी उपयोग नाही.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी 

या घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांची मदत घेण्याचे सुचवले आहे. त्यांची यापूर्वीच्या तपासातील भूमिका महत्त्वाची ठरल्याने त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

राज्यात बनावट औषधांच्या घोटाळ्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

579 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क