सातारा परिसरातील धुळे सोलापूर महामार्गावर मॉर्निंग वॉकिंगला गेलेल्या अशोक गुलाबराव भदाणे (वय 65) यांना अज्ञात इसमांनी लुटल्याची घटना शनिवार रोजी सकाळी पाऊने नऊच्या सुमारास घडली. तक्रारीनुसार, दोन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या हातातील 5 ग्रॅम वजनाची, सुमारे 30,000 रुपयांची सोन्याची अंगठी हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपी एका मोटरसायकलवर बसून देवळाईच्या दिशेने पळून गेले.
घटनेनंतर भदाणे यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सातारा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*