शहरातील सिग्नल आणि चौकांवर वाहनचालकांकडून बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर शहर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली आणि सिडको चौकात चार तृतीयपंथीयांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तरीही या प्रकारात काहीही कमी न झाल्याने अखेर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पुढील 60 दिवसांसाठी तृतीयपंथीयांना सार्वजनिक ठिकाणी भीक मागण्यास मनाई केली आहे.
आदेशानुसार, तृतीयपंथीयांना ट्राफिक सिग्नल, चौक, रस्ते किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी एकट्याने किंवा गटाने एकत्र येऊन भीक मागण्यास मनाई करण्यात आली आहे. ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर या काळात या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल लागताच तृतीयपंथीय वाहनाजवळ जाऊन पैसे मागतात. नकार दिल्यास बळजबरी करतात. हे प्रकार वाढल्यामुळे पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे.
या आदेशानुसार, कोणीही तृतीयपंथीयांना जन्म, मृत्यू, लग्न आदी कार्यक्रमांसाठी आमंत्रित करू नये, अशी सूचनाही देण्यात आली आहे. शहरातील दर्गा चौक, क्रांती चौक, सेव्हन हिल उड्डाणपूल आदी ठिकाणी विशेष लक्ष ठेवून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
(फोटो – प्रतीकात्मक)
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*