घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या सत्राच्या १९ विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या चौथ्या व पाचव्या सत्रातील ११ विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना वसतिगृहातूनही बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
शनिवारी दुपारी, १९ कनिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहात बोलावून वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर शिवीगाळ करत गाणी म्हणण्यास भाग पाडले. यावेळी एका विद्यार्थ्याला ढकलून दिले असता त्याचे डोके भिंतीवर आदळले, ज्यामुळे त्याला इजा झाली. उपचार घेतल्यानंतर या प्रकाराची माहिती समोर आली. नंतर नर्सिंग प्रशासनाने तातडीने चौकशी करून अँटी रॅगिंग कमिटीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. गुरुवारी, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना अहवाल सादर करण्यात आला, ज्यात रॅगिंग झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी सांगितले की, “नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची इमारत उपलब्ध करून दिली आहे. सत्रासाठी निलंबित केलेल्या ११ विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडावे लागेल. उर्वरित २७ विद्यार्थ्यांबाबत, त्यांना वसतिगृहात ठेवावे की नाही, याबाबतचा निर्णय कॉलेज काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात येईल.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*