महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेने उद्योगांसाठी आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या आणि भारत सरकारच्या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्द्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या इंडो-जर्मन टूल रूम (आयजीटीआर), छत्रपती संभाजीनगर या नामांकित प्रशिक्षण संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत, अमृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन संस्थेच्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांना उत्कृष्ट दर्जाचे निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण, राहण्याची व जेवणाची सर्व खर्चाची जबाबदारी अमृत संस्थेच्या वतीने उचलली जाणार आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसलेल्या महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १८ ते ४० वयोगटातील युवक-युवतींना या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेअंतर्गत १५ निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि ३० अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आयजीटीआर (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या विविध उपकेंद्रांमध्ये दिले जाणार आहेत. १० वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर किंवा अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तसेच, अर्जदाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे आवश्यक आहे.

योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दीपक जगताप (९६७३७१४१७०), अनिकेत देशमुख (९६६५१६२४४१) किंवा आनंद निकाळजे (९३२५४८७०७३) यांच्याशी संपर्क साधावा.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

604 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क