Oplus_131072

छत्रपती संभाजीनगर : भरधाव हायवाने पादचारी महिलेला चिरडल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (२९ जानेवारी) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की, हायवाच्या मागील टायरमध्ये महिला पूर्णपणे अडकून गेली. त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने हायवा उचलून महिलेचा मृतदेह बाहेर काढावा लागला.

या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. महिला गंभीर जखमी अवस्थेत असल्याने तिला तातडीने मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

या अपघातात मालनबाई विनायक चौधरी (५२, रा. सुंदरवाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या केंब्रिज शाळेत गेल्या २५ वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. अधिक उत्पन्नासाठी त्या शाळेतील काम आटोपून चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी येथे एका शिक्षिकेच्या घरी कामाला जात असत. दरम्यान, सायंकाळी शाळेचे काम आटोपून चौधरी कॉलनीत जात असताना मिनी घाटीसमोर रस्ता ओलांडताना हा दुर्दैवी अपघात घडला.

वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल

अपघातानंतर हायवा मुख्य रस्त्यावरच उभा राहिल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात वाहने रांगेत उभी राहिल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने हायवा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

सुंदरवाडी गावात हळहळ

मालनबाई या सुंदरवाडी गावातील रहिवासी होत्या. त्या आपल्या नोकरीत प्रामाणिक आणि जबाबदार म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचा एक मुलगा असून मुलीचे लग्न झाले आहे. त्यांना नातवंडे देखील आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच गावातील अनेक नागरिक चिकलठाण्यात धावले.

हायवा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

या अपघातानंतर चिकलठाणा पोलिसांनी हायवा (क्र. एमएच २० ईके ९५९७) जप्त केला असून चालक प्रवीण देवूबा पाटील (३२, रा. लाडसावंगी) यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,129 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क