छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून तब्बल १५ लाख रुपये उकळणाऱ्या एका महिलेसह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिटी चौक पोलिसांनी रंगारगल्लीत ट्रॅप लावून २४ वर्षीय महिलेचा रोख रक्कम घेताना पर्दाफाश केला.
पोलिसांनी मंगळवारी (दि. २८) रात्री सापळा रचून पुष्पा साळवे (२४), अर्जुन लोखंडे (३०), हनी भूषण चव्हाण (१८), क्रिस्टल नीलेश रानडे (२०) आणि आदित्य शेरे (वय २२, सर्व रा. भावसिंगपुरा) यांना अटक केली. त्यांच्याकडून २० हजार रुपये रोख आणि एक बंदूक जप्त करण्यात आली आहे.
असा रचला हनी ट्रॅपचा जाळ
पुष्पा साळवे हिने व्यापाऱ्याशी आधी मैत्री करत त्याला जाळ्यात ओढले. व्हॉट्सॲपवर संवाद सुरू झाला, त्यानंतर काही खासगी व्हिडिओची देवाणघेवाण झाली. या माध्यमातून त्या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करण्याचा डाव रचण्यात आला. मागील आठ महिन्यांपासून आरोपींनी व्यापाऱ्याला धमकी देत पैसे उकळण्याचा प्रकार सुरू केला होता. व्यापाऱ्याने प्रतिमा जपण्यासाठी या टोळीला वारंवार मोठी रक्कम दिली. मात्र, त्यांना पैसे मिळताच काही दिवसांतच पुन्हा मागणी केली जात होती.
शेवटी व्यापाऱ्याने घेतली पोलिसांची मदत
ब्लॅकमेलिंगचा त्रास सहन न झाल्याने अखेर व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीपी संपत शिंदे आणि पीआय परदेशी यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली. रंगारगल्ली परिसरात सापळा रचून टोळीतील महिलेची रोख रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत या टोळीने इतर व्यापाऱ्यांनाही अशाच प्रकारे लुटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील प्रमुख आरोपी महिलेचा पती देखील सराईत गुन्हेगार असून तो सध्या एमपीडीएमध्ये तुरुंगात आहे.
पोलिस तपास सुरू
या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. व्यापाऱ्यांना अशा हनी ट्रॅप प्रकारांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*