Oplus_131072

राज्यात सध्या अपघातांचे सत्र सुरू असून, समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रकला ट्रॅव्हलर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा अपघात आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हलर टेम्पोने उभ्या आयशर ट्रकला इतक्या जोरात धडक दिली की, दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः ट्रॅव्हलरच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. जखमींमध्ये ड्रायव्हर आणि सहायकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे. अपघाताची चौकशी सुरू असून या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,590 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क