सिडको चौक परिसरात जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून घरातील एकमेव कमावता मुलगा, राजू नानासाहेब गायकवाड (वय २५) या मूकबधिर तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. २८ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास रस्त्यावर खड्डा न दिसल्यामुळे राजू त्यात पडून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान ३० ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
राजूच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार संपला आहे. त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी राजूवर होती. राजू मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा हाकत होता. परंतु या दुर्घटनेमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
राजूच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबाने १२ तास पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*