छत्रपती संभाजीनगर : भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) नावाखाली १० कोटींहून अधिक रुपयांचा तांदूळ घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तेलंगणातून अटक केली आहे. जिन्ना व्यंकट रमणा रेड्डी (रा. वेनमपल्ली, जि. पेदापल्ली, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात १७ जुलै २०२४ रोजी फसवणूक, विश्वासघात व बनावट कागदपत्रांचा वापर आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘रँडीको’ कंपनीला इथेनॉल निर्मितीसाठी ५५ हजार ९०८ मेट्रिक टन तांदूळ पुरवठा करण्याबाबत FCI सोबत करार झाला होता. या करारानुसार कंपनीने FCI च्या खात्यात ११२ कोटी ९९ लाख रुपये जमा केले होते.

मात्र आरोपी जिन्ना रेड्डी व इतरांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रत्यक्षात तांदूळ पुरवठा न करताही तो केल्याचे भासवले. या माध्यमातून सुमारे १० कोटी ११ लाख ३२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मागील दोन वर्षांपासून फरार होता. तपासासाठी पोलिसांचे पथक गेल्याची माहिती मिळताच तो वेगवेगळ्या राज्यांत पळून जात असल्याचे तपासात समोर आले.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने आरोपीचा माग काढला. विश्वसनीय माहितीच्या आधारे रविवार रोजी तेलंगणातील वेनमपल्ली येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईदरम्यान गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,234 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क