छत्रपती संभाजीनगर : जयभवानीनगर परिसरातून कारमध्ये लिफ्ट घेऊन सिडको चौकापर्यंत आलेल्या एका महिलेने चालकाचा मोबाइल हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने मित्रासह तिचा पाठलाग करून गाठले असता तेथे तिच्या साथीदारांनी उलट त्यांनाच मारहाण करून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना रविवारी पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास सिडको चौक परिसरात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात संबंधित महिलेसह रोहित म्हस्के, ऋषिकेश आणि एका अनोळखी इसमाचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. राहुल विद्याधर पंडित (वय ३९, रा. सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पंडित हे ८ मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या कारने मित्र करणजित सिंग यांच्यासोबत जात होते. जयभवानी चौक परिसरात एका महिलेने पाच वर्षांच्या मुलीसह त्यांच्या गाडीजवळ येऊन सिडको बसस्थानकापर्यंत सोडण्याची विनंती केली. मानवतेच्या दृष्टीने राहुल यांनी त्यांना गाडीत बसवून घेतले.

मात्र काही अंतरावर गेल्यानंतर संबंधित महिला अचानक गाडीतून उतरून पळ काढू लागली. त्याचवेळी तिने राहुल यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात येताच राहुल आणि त्यांचे मित्र करणजित सिंग यांनी तिचा पाठलाग केला.

वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ त्यांनी त्या महिलेला गाठले. तेथे कविता नावाची आणखी एक महिला उभी होती. राहुल यांनी त्यांच्याकडे मोबाइलबाबत चौकशी केली असता तेथे उपस्थित असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी अचानक शिवीगाळ करत राहुल यांना गाडीतून बाहेर ओढले. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

या गोंधळात आरोपींनी करणजित सिंग यांच्या कानातील सुमारे १.५ ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी जबरदस्तीने काढून घेतली आणि तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक राजीव म्हात्रे पुढील तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

514 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क