छत्रपती संभाजीनगर : शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. याआधी सतीश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार गटात प्रवेश केला होता, मात्र आता ते पुन्हा अजित पवार गटात सहभागी होणार आहेत.
शिर्डीत होत असलेल्या अजित पवार गटाच्या दोन दिवसीय अधिवेशनात आज सतीश चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी याबाबत स्पष्ट केले की, सतीश चव्हाण यांचे 6 वर्षांसाठीचे निलंबन रद्द करण्यात आले आहे.
सतीश चव्हाण यांचा राजकीय प्रवास:
सतीश चव्हाण हे मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी आहेत. ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. 2020 मध्ये त्यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा 57,895 मतांनी दारुण पराभव केला होता.
शिर्डीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिवेशन:
शिर्डीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. आजच्या अधिवेशनात सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण धोरणे ठरवली जातील.
सतीश चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाला मोठा राजकीय बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*