छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी विनापरवानगी ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्या चार जणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. दौलताबाद व बेगमपुरा पोलिस ठाण्यात या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन खाजगी ड्रोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे ड्रोन व्यावसायिक तसेच फोटोग्राफी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.

पुरातत्व स्थळांचे चित्रीकरण

महंमद इकरामोददिन महंमद मुस्तफा शरीफ (वय २९), मोहम्मद मोइनोद्दिन मोहंमद इरफान (वय १८), शेख मुद्द्सीर शेख रज्जाक आणि खान रेहान इरफान (वय २५) या चौघांवर पुरातत्व विभागाच्या वास्तूंचे विनापरवानगी चित्रीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी दौलताबाद किल्ला, सोनेरी महल आणि बीबी का मकबरा यांसारख्या ऐतिहासिक स्थळांचे चित्रीकरण केल्याचे आढळले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कदीर देशमुख आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

इंस्टाग्रामचा वापर करून आरोपींची ओळख

आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी समाज माध्यमांचा वापर केला. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंचा शोध घेत आरोपींवर कारवाई करण्यात आली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,904 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क