Oplus_131072

छत्रपती संभाजीनगर शहरात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कुत्ता गोळ्या सुरतहून आणल्या जात असल्याचे धक्कादायक उघड झाले आहे. सायबर पोलिसांनी मंगळवारी (५ नोव्हेंबर) १,७०० कुत्ता गोळ्या व नशेच्या १० औषधांचा साठा जप्त करत तीन जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सय्यद सलमान सय्यद सऊद (२७), अकबर सलीम शेख (२३) आणि माजीद युनूस बेग (२४) यांचा समावेश आहे.

सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांना माहिती मिळाली होती की, सुरत येथून तीन व्यक्ती नाशिकमध्ये नशेची औषधे आणत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नगर नाका परिसरात सापळा रचून, सुरतहून येणाऱ्या आर. आर. कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसमधील प्रवाशांची तपासणी केली. या तपासणीत तिघांच्या बॅगमध्ये १,७०० कुत्ता गोळ्या, नशेची औषधे आणि धारदार शस्त्र सापडले. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काय आहे ‘कुत्ता गोळी’?

‘कुत्ता गोळी’ म्हणून ओळखली जाणारी ही गोळी नायट्रोसून-टेन या नावाने औषध बाजारात उपलब्ध आहे. ही गोळी घेतल्यानंतर शरीर सुन्न होते व वेदनांची जाणीव होत नाही. गोळीत असलेले रसायन थेट मेंदूवर परिणाम करून झोप आणण्यास मदत करते. त्यामुळे ही गोळी नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या विकण्यास बंदी आहे; मात्र काळ्या बाजारात १५० रुपयांना विकली जाते.

सायबर पोलिसांच्या तपासात आरोपी सय्यद सलमानवर चोरीचे गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. तो मागील चार वर्षांपासून या गोळ्यांचा धंदा करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,059 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क