कांचनवाडी परिसरातील एका प्राध्यापकाच्या घरात चोरट्यांनी ४ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने चोरले आहेत. ही घटना १० ते १३ सप्टेंबरदरम्यान घडली असून, याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. बाळासाहेब धर्माधिकारी, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक, हे गौरी पूजनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेले होते. १३ सप्टेंबर रोजी पहाटे ते परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून सामान अस्ताव्यस्त फेकले होते. लाकडी कपाटातील १ लाख २२ हजारांच्या बांगड्या, ५० हजारांची सोन्याची चेन, २५ हजारांची अंगठी, ६५ हजारांचे नेकलेस, ६५ हजारांचे गंठण, आणि २० हजारांच्या कर्णफुलांसह एकूण ४ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

962 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क