छत्रपती संभाजीनगर: ‘जयंती 2’ हा केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेला चित्रपट नसून, समाजातील विविध घटकांच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारा आणि विचार करायला भाग पाडणारा चित्रपट असल्याचे मत डॉ. राहुल जावळे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांच्या भविष्यासमोरील आव्हाने तसेच शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तव या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घेण्यापुरते मर्यादित न राहता बदलत्या परिस्थितीनुसार नवा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन नव्या संधींचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्योजकतेच्या माध्यमातून तरुणांना रोजगारनिर्मितीची दिशा मिळू शकते, तसेच स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणाही मिळू शकते, हा संदेश ‘जयंती 2’मधून देण्यात आला आहे.

परिस्थिती बदलण्यासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नसून विचारांमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक घडवतो, तर शेतकरी हा समाजाच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा आधार आहे. संघर्षातून संधी, वेदनेतून विचार आणि विचारातून परिवर्तनाचा प्रवास दाखवणारा ‘जयंती 2’ समाजासाठी महत्त्वाचा संदेश देतो, असे डॉ. जावळे यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

823 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क