छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 41 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याआधी 8 ऑक्टोबर रोजी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे माघार घेणाऱ्यांची संख्या 13 झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्याची माहिती दिली.

या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या काळात 62 उमेदवारांनी एकूण 92 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले, तर 54 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर अर्ज माघारीची मुदत संपल्यावर अंतिम रिंगणात 41 उमेदवार राहिले.

निवडणूक लढविणाऱ्या 41 उमेदवारांची संपूर्ण यादी

पक्षीय उमेदवार

1. चव्हाण सतीश भानुदासराव — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

2. घुगे दिलीप हरिभाऊ — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

3. डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

4. कृष्णा त्रिंबकराव पवार — महाजनता परिवर्तन पार्टी

5. ॲड. प्रज्ञावंत काशीराम मोरे — रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)

6. श्रीधर साळवे — भीमसेना

7. शेख अब्दुल मलीक अब्दुल खुद्दूस — राष्ट्रीय समाज पक्ष

8. संजीवनी मदनराव टेकाळे — स्वराज्य निर्माण सेना

अपक्ष उमेदवार

9. अकील अहमद शेख

10. रविराज उर्फ अण्णासाहेब शेषनाथ साबळे-पाटील

11. चव्हाण अरुण चिंतामण

12. अविनाश बंडू गोरे

13. प्रा. डॉ. अश्विन कुमार पूरभाजी क्षीरसागर कोळीकर

14. डॉ. अशोक दत्तात्रय कोल्हे

15. अशोक दत्ता हेमके

16. ॲड. अंबादास जाधव

17. कबाडी भागवत मदन

18. किशोरकुमार प्रकाश शिंदे

19. केशव दादाराव तांदळे

20. अब्दुल खालेद अब्दुल रशीद

21. उगले गजानन रामनाथ

22. घोटे सुशील सुरेशराव

23. नरसिंह पांडुरंग घोणे

24. नामदेव केरबा वाघमोडे

25. नारायण त्रिंबक सोन्नी

26. रमेश विनायकराव पाटील

27. बालाजी सरस्वती-रामचंद्र पाटील चाकूरकर

28. डॉ. भाऊसाहेब केशवराव झिरपे

29. ॲड. भारत आसाराम फुलारे

30. गंगाधरे भालचंद्र लक्ष्मण

31. मनीषा उर्फ मंदा खरात

32. इसा यासीन

33. ॲड. यशोनिल उत्तमराव मोगले

34. सर युसुफ खान हनीफ खान

35. राजेंद्र लक्ष्मणराव शिंदे शिंपाळकर

36. डॉ. रोहित शिवराम बोरकर

37. ॲड. विठ्ठल आबाराव कडवे

38. तळेकर विठ्ठल भुजंगराव

39. विशाल छाया उद्धव नांदरकर

40. आजम शेख

41. ॲड. ज्ञानोबा ईश्वर माने

23 ऑक्टोबरला मतदान, 27 ऑक्टोबरला मतमोजणी

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी, चिकलठाणा येथील वुडस्ट्रीम डेकर एलएलपी येथे होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी 445 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला सहआयुक्त मंजुषा मिसकर, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त कुशालसिंह परदेशी, उपआयुक्त देविदास टेकाळे आणि तहसीलदार के. के. भदाणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्याने आता निवडणुकीचा पुढील महत्त्वाचा टप्पा मतदानाचा असेल. 23 ऑक्टोबरच्या मतदानानंतर 27 ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवारांचे लक्ष राहणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

571 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क