छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असून, काल (12 मार्च) यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. 11 मार्च रोजी कमाल तापमान 37.4 अंश सेल्सिअस होते, तर किमान तापमान 20.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विशेष म्हणजे, मार्च महिन्यातील अवघ्या 12 दिवसांत पाच वेळा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
काल दुपारी उन्हाचा तीव्रतेमुळे रस्त्यावरची वर्दळ तुलनेने कमी दिसली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागला होता. आता दुसऱ्या आठवड्यातही उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत आहे.
तापमानवाढीमुळे उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*