छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या नेहमीच ऐरणीवर असताना, आता एका मंत्र्याविरोधात थेट रस्त्यावर बॅनरबाजी करत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “शेतकऱ्यांचे पैसे खाणारा?” आणि “शेतकऱ्यांचे पैसे लाटणारा मंत्री?” अशा आशयाचे बॅनर आज रात्रीपासून शहरात झळकत आहेत.
विशेष म्हणजे, मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या एका बॅनरमध्ये, “शेतकऱ्यांच्या नावे पैसे खाणारा मंत्री” असा थेट आरोप करण्यात आला आहे. या बॅनरवरून शहरात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
यात आणखी एक ठळक मजकूर म्हणजे, “मंत्र्याला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खायला पाठवलंय का, देवेणभाऊ?” असा उपरोधिक सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच “लाडका मंत्री, व्यापारी वृत्ती” असा उल्लेख करून त्या मंत्र्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
हे बॅनर नेमके कोणी लावले याबाबत माहिती मिळालेली नसली, तरी या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. संबंधित मंत्री कोण? शेतकऱ्यांच्या निधीबाबत नेमका आरोप काय आहे? हे सर्व स्पष्ट होणे गरजेचे आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या बॅनरमागील व्यक्ती किंवा गटाचा शोध घेत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*