छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात नियोजित पार्किंगच्या जागा निश्चित नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यास महापालिकेच्या पथकाकडून ती उचलण्यात येतात, त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक दंडासह वेळेचा अपव्यय सहन करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरात सुव्यवस्थित पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रायोगिक तत्त्वावर पार्किंग सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात आधुनिक पद्धतीने पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी गुजरात येथील एका खासगी कंपनीला काम सोपविण्यात आले आहे.

दरम्यान, स्मार्ट सिटी उपक्रमाच्या माध्यमातून ‘सीएसएन स्मार्ट पार्क’ नावाचे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांना पार्किंगची जागा शोधणे आणि अॅडव्हान्स बुकिंग करणे शक्य होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून दुचाकीसाठी प्रति तास १० रुपये, तीनचाकीसाठी १५ रुपये आणि चारचाकीसाठी २० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

चांदणे चौक ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पार्किंगसाठी मार्किंग करण्यात आले असून, पुढील टप्प्यात शहरातील इतर संभाव्य ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, वाहतूक विभागाचे उपायुक्त, विधी सल्लागार आदींचा समावेश आहे.

शहरात शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था लागू झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांचा दैनंदिन त्रासही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती आणि कडक अंमलबजावणी आवश्यक ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,042 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क