छत्रपती संभाजीनगर : शहरात बेकायदा बॅनर काढताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना संतापजनक ठरली आहे. मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात आज सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अमोल दिनकर जाधव (वय २७, रा. संजय नगर, गल्ली क्रमांक ५) हे विजेच्या खांबावर लावलेले बेकायदा बॅनर काढत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार झटका बसला. झटका इतका तीव्र होता की ते खाली कोसळले. स्थानिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्घटनेत रवी रणधीर रिडलॉन (वय ३८, रा. गांधी नगर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमोल जाधव यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
शहरात सण, कार्यक्रम आणि राजकीय प्रचाराच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेकायदा बॅनर लावले जातात. अशा निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा आधार हरपल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*