छत्रपती संभाजीनगर : शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट तसेच इतर दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या बदल करून मोठा आवाज करणारे सायलेंसर लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत एकूण 1028 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 705 कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर जप्त करण्यात आले होते.

ही मोहीम मार्च 2026 दरम्यान शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक विभागाच्या पाचही शाखांमार्फत राबविण्यात आली. नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेले 705 सायलेंसर आज रोजी पोलिस मुख्यालयात रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.

या कारवाईवेळी पोलिस उपायुक्त (वाहतूक), सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. शहरात शांतता राखण्यासाठी व वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

तसेच, पुढील काळातही अशा प्रकारची विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. वाहनचालकांनी वाहनाचे सर्व कागदपत्र सोबत ठेवावेत आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, कर्णकर्कश सायलेंसर बसवून देणाऱ्या मेकॅनिक व गॅरेज चालकांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर बदलांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

438 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क