छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आणि स्वराज्याच्या स्वाभिमानाशी निगडित आहे. मात्र, शहरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित रॅलीदरम्यान एका तरुणाने औरंगजेबाचा फोटो झळकवल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी रॅली व मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. याच दरम्यान एका रॅलीत सहभागी झालेल्या तरुणाने औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन ते नाचवत असल्याचे दिसून आले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला. महापुरुषांच्या विचारांचा संदेश देणाऱ्या रॅलीमध्ये अशा प्रकारे एका ऐतिहासिक आक्रमकाचे चित्र झळकवणे, हा प्रकार प्रक्षोभक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर विविध राजकीय व सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली. संबंधित तरुणावर कठोर कारवाई करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे वर्तन अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर हे संवेदनशील शहर मानले जात असल्याने, अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. दरम्यान, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,496 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क