छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात भर दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहुण्याच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, पोलिसांसाठी तपासात महत्त्वाचा पुरावा ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. हीच संधी साधत चारचाकी वाहनातून आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील कपाटे फोडून अंदाजे ७६ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेला. चोरी केल्यानंतर ते पुन्हा चारचाकीत बसून पसार झाले.

दरम्यान, घरात शिरताना तसेच चोरी करून बाहेर पडताना चोरट्यांचे सर्व हालचाली सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेची माहिती मिळताच हर्सूल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसाढवळ्या होणाऱ्या अशा घरफोड्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,565 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क