छत्रपती संभाजीनगर : शहरातील उल्कानगरी आणि परिसरात सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना सातत्याने वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २० एप्रिल रोजी सकाळी १० ते १०.१५ वाजण्याच्या सुमारास भगवती कॉलनीच्या पाठीमागील परिसरात एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेला लक्ष्य करत चोरट्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी आणि चांदीची तुळशीची माळ हिसकावून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली.


 

या प्रकरणी मोहिनी मोहन पाठक (वय ६९, रा. चित्रांगण बिल्डिंग, श्री समर्थ हौसिंग सोसायटी, जवाहर कॉलनी) यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाठक या २० एप्रिल रोजी सकाळी ओंकारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपून त्या पायी घरी परतत असताना भगवती कॉलनीच्या पाठीमागील डीपीजवळ त्यांच्या मागून एक संशयित व्यक्ती हातात चप्पल घेऊन चालत येताना दिसला.

त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद होत्या. काही अंतर पुढे जाऊन त्याने अचानक यू-टर्न घेत पाठक यांच्या समोर येत त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी आणि चांदीत गाठलेली तुळशीची माळ हिसकावली. घटनेनंतर आरोपी काही अंतर पळत जाऊन एका दुचाकीवर पाठीमागे बसून फरार झाला.

या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांना आरोपीचा माग काढणे सोपे होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार मनोज उईके करत आहेत.

दरम्यान, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

779 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क