छत्रपती संभाजीनगर : शहरातील पुंडलिक नगर परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने मैत्रीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अवघ्या दोन तासांपूर्वी ज्या मित्रांसोबत हसत-खेळत फोटो काढले, गप्पा मारल्या आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवले, त्याच मित्रांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहित उर्फ करण रवी म्हस्के (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. रोहित आणि त्याच्या काही मित्रांमध्ये मागील काही महिन्यांपासून जुन्या वादातून तणाव सुरू होता. मात्र, मंगळवार (२१ एप्रिल) रात्री आरोपींनी रोहितला विश्वासात घेत त्याला आपल्या सोबत फिरायला नेले. सर्वांनी एकत्र वेळ घालवला, फोटो काढले आणि रोहितने ते फोटो आपल्या सोशल मीडियावर स्टेटस म्हणून शेअर केले.

मात्र, या स्टेटसनंतर अवघ्या दोन तासांतच घटनांनी भयावह वळण घेतले. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल मैदानावर आरोपींनी रोहितला गाठले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार करत निर्घृणपणे हत्या केली. हा हल्ला इतका भीषण होता की रोहितचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार रोहित म्हस्के हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कृष्णा उदावंत, सागर घुले, बादशहा शेख, प्रफुल्ल पाखरे आणि शोएब शेख या पाच आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील सहावा आरोपी अक्षय पडूळ हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

अलीकडेच याच परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर ही हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांनी अधिक कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,015 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क