छत्रपती संभाजीनगर : शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून अंगुरीबाग व जूना मोंढा परिसरात तब्बल ५,१७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महापौर, पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयुक्तांच्या सूचनेनुसार विशेष पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे संबंधित विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मनपाच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून शालिमार प्लास्टिक, संजय प्लास्टिक, एनजी प्लास्टिक यांसह इतर विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. संबंधित विक्रेत्यांकडून एकूण सुमारे ७५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. तसेच ट्रान्सपोर्ट कंपन्यांवरही कारवाई करत प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक रोखण्यात आली.

या धडक मोहिमेमुळे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. या पथकात देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, संतोष बनकर, किशन निकम, ज्ञानेश्वर पाटील, रतन वाघ, नारायण फुके, जयेश मगरे यांचा समावेश होता. तसेच स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, अभिजित गंगावणे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

जप्त करण्यात आलेला प्लास्टिक साठा हर्सूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठवण्यात आला असून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठा किंवा विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि गरज भासल्यास फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील.

नागरिकांनीही पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

585 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क