छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिद्धार्थ उद्यानातील लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेली मिनी रेल्वे शनिवारी (दि. २८) दुपारी अचानक रुळावरून घसरल्याने तीन बालक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे उद्यानात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.

शुक्रवारी मोहरमची सुटी आणि त्यानंतर शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे सिद्धार्थ उद्यानात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. शहरासह ग्रामीण भागातूनही अनेक कुटुंबे उद्यानात फिरण्यासाठी आली होती. सकाळपासूनच पालकांसह मोठ्या संख्येने बालगोपाळ उद्यानात दाखल झाले होते. यावेळी मुलांसाठी आकर्षण असलेल्या मिनी रेल्वेमध्येही मोठी गर्दी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. मिनी रेल्वेच्या रुळांवरही पाणी साचल्याने आणि ओलाव्यामुळे काही ठिकाणी रुळ कमकुवत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी दुपारी रेल्वे फेरी सुरू असताना अचानक एक डबा एका बाजूला कलंडल्याने रेल्वे रुळावरून घसरली. या घटनेत तीन बालकांना किरकोळ दुखापत झाली.

घटना घडताच उपस्थित पालकांनी एकच आरडाओरड करत संताप व्यक्त केला. सुरक्षारक्षक व उद्यान कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच पुढील अनर्थ टाळण्यासाठी मिनी रेल्वेची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित यंत्रणेची तपासणी करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

826 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क