छत्रपती संभाजीनगर : शहरातील बेकायदा बांधकामे गुंठेवारी कायद्यान्वये नियमित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पुन्हा एकदा मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या बेटरमेंट चार्जेसमध्ये ५० टक्के शुल्क सवलत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बेकायदा बांधकामधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून गुंठेवारी विभागात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

महापालिकेच्या टप्पा क्रमांक ३ मधील गुंठेवारी विभागात गेल्या दोन दिवसांत शंभरहून अधिक नागरिकांनी सवलतीबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला आहे. तसेच आतापर्यंत २० हून अधिक प्रस्ताव नियमितीकरणासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी शासनाने २००५ मध्ये गुंठेवारी कायद्यांतर्गत मंजुरी दिली होती. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणावर २००५ नंतर आणि विशेषतः २०२० पर्यंत बेकायदा बांधकामे झाल्यामुळे या मालमत्तांचाही योजनेत समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने कायद्यात सुधारणा करून ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या बांधकामांना नियमितीकरणासाठी पात्र ठरविले.

यापूर्वीही २०२१ ते २०२३ या कालावधीत महापालिकेने ५० टक्के शुल्क सवलत दिली होती. त्यातून महापालिकेला सुमारे १२० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तसेच प्रशासकीय कालावधीतही दोन वेळा सवलत देण्यात आली होती, ज्यातून ५० कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला होता.

नवीन निर्णयानुसार १५ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करणाऱ्या नागरिकांना बेटरमेंट चार्जेसमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. तर १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करणाऱ्यांना २५ टक्के शुल्क सवलतीचा लाभ मिळणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,158 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क