छत्रपती संभाजीनगर : म्हाडा कॉलनी परिसरातील एका सराफा दुकानाचे शटर उचकटून चार चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना २ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे, दुकानात चोरटे घुसल्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अलर्ट दुकानदाराच्या मोबाइलवर मिळताच त्यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरटे चोरी करून पसार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश दत्तात्रय कमोदे (३०, रा. विठ्ठल नगर, सिडको एन-२) यांचे म्हाडा कॉलनीत सराफा दुकान आहे. २ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ते घरी असताना त्यांच्या मोबाइलवरील सीसीटीव्ही अॅपवर ‘ह्युमन बॉडी डिटेक्शन’चा अलर्ट आला. दुकानात संशयित व्यक्ती घुसल्याचे लक्षात येताच आकाश यांनी भाऊ अजय कमोदे यांच्यासह तातडीने दुकान गाठले.

दुकानाचे शटर खालच्या बाजूने उचकटलेले आणि अर्धवट उघडे असल्याचे त्यांना दिसले. मात्र, चोरटे त्यापूर्वीच पसार झाले होते. आकाश यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दुकानाची पाहणी केली असता कॅश काउंटरचे लॉक तुटलेले आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर चार चोरटे दुकानात प्रवेश करून चोरी करत असल्याचे स्पष्ट झाले.

सोन्याच्या नथींसह रोख रक्कम लंपास

चोरट्यांनी प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच नथी, प्रत्येकी १० ग्रॅम वजनाची चांदीची दोन मंगळसूत्रे आणि गल्ल्यातील चार हजार रुपये असा एकूण सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हवालदार कैलास जायभाये पुढील तपास करीत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चारही चोरट्यांचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

307 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क