छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या सणासाठी बाजारपेठ सजली असताना छत्रपती संभाजीनगरातील फुल बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी उलाढाल पाहायला मिळाली. हार, तोरणे आणि पूजेसाठी फुलांची खरेदी करण्यासाठी सोमवारी ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र, बाजारात फुलांचा साठा मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. प्रतिकिलो २५ ते ५० रुपये दर मिळाल्याने उत्पादनासाठी केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मोठी आवक, पण अपेक्षित दर नाहीत

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारात मराठवाड्याच्या विविध भागांतून सुमारे २०० ते २५० टन झेंडूची फुले विक्रीसाठी आली. परभणी, बीड, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी फुलांची वाहतूक करून ती बाजारात आणली. पावसाच्या कमतरतेमुळे यंदा उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे झेंडूला किलोमागे ७० ते ८० रुपये भाव मिळेल, अशी उत्पादकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र मोठ्या आवकेमुळे दर कमी राहिले.

ग्राहकांची गर्दी; फुलांच्या दरात चढ-उतार

गारखेडा परिसरासह जाधववाडी बाजार समितीच्या परिसरात आणि सिडको-हडको भागात फुलांची खरेदी-विक्री सुरू होती. झेंडूसोबत शेवंती, गुलाब, अॅस्टर, गुलछडी आणि जर्बेरा या फुलांनाही मागणी होती. दसऱ्यासाठी हार तयार करणारे विक्रेते आणि किरकोळ ग्राहक यांची बाजारात वर्दळ वाढली होती. मात्र, शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहकांना विकली जाणारी फुले यांचे भाव यांत फरक असल्याची चर्चा बाजारात होती.

जिंतूर तालुक्यातील शेतकरी सदाशिव मते यांनी यंदा अपेक्षेइतका भाव मिळाला नसल्याचे सांगितले. उंब्रज येथील रामभाऊ ढगे यांनी दीड एकरात झेंडूची लागवड केली होती. पावसाअभावी उत्पादन घटले असून, दसऱ्यासाठी आणलेल्या १०० क्रेट फुलांना प्रतिकिलो ३० ते ५० रुपये भाव मिळाला.

दिवाळीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

दसऱ्यात अपेक्षित दर न मिळाल्याने आता दिवाळीच्या काळात फुलांना चांगली मागणी मिळेल आणि भाव सुधारतील, अशी आशा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

495 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क