मुंबई : दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, २ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळणार असून, १६ नोव्हेंबर रोजी शाळांमधील नियमित अध्यापन पुन्हा सुरू होणार आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पहिल्या शैक्षणिक सत्राची सांगता होईल. १५ जूनपासून सुरू झालेले हे सत्र ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या सणासाठी विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार आहे. या कालावधीत कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी आणि बाहेरगावी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळेल.

नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुट्ट्यांचा आनंद

जाहीर वेळापत्रकानुसार, दिवाळीची सुट्टी २ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत असणार आहे. दिवाळीशी संबंधित विविध सण आणि रविवार लक्षात घेता, १६ नोव्हेंबरपासून शाळांचे कामकाज पुन्हा सुरू होईल. शाळा सुरू होण्याच्या तारखेनुसार पालकांना मुलांच्या अभ्यासाचे आणि प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. हे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ पासून १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे. या काळात शाळांमध्ये उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासह परीक्षा आणि इतर शैक्षणिक उपक्रम पार पडतील.

उन्हाळी सुट्ट्यांची तारीखही निश्चित

दिवाळीच्या सुट्ट्यांसोबतच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांचेही नियोजन करता येणार आहे. शैक्षणिक वेळापत्रकानुसार, ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ या काळात उन्हाळी सुट्टी असणार आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्यांची एकूण संख्या ७६ दिवसांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश माध्यमिक शाळा संहितेनुसार देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांना जाहीर वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे लागणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

909 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क