Chhatrapati Sambhajinagar February Temperature Record

छत्रपती संभाजीनगर : शहरात मागील काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत असून, सोमवारी (१७ फेब्रुवारी) कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सियसवर पोहोचले. हे गेल्या पाच वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक तापमान असून, यापूर्वी २०२१ मध्ये २८ फेब्रुवारी रोजी ३६ अंश तापमानाची नोंद झाली होती.

गेल्या दोन दिवसांपासून शहराचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियसच्या घरात होते. मात्र, सोमवारी तापमानात आणखी वाढ होऊन ३६.२ अंशांवर पोहोचले. ही वाढती उष्णता शहरवासीयांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून, दुपारी बाहेर पडणे टाळत आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा प्रभाव वाढत असल्याने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरातील तापमानवाढीमागे हवामान बदल आणि वाढत्या प्रदूषणाचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस शहरात उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः दुपारच्या वेळेस घराबाहेर पडताना आवश्यक सावधगिरी बाळगावी, तसेच जास्त पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

668 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क