swiss_goat_sambhajinagar
स्वित्झर्लंड देशातील सानियन प्रजातीचा दुर्मिळ बोकड संभाजीनगरातील आमखास मैदानावर भरवलेल्या एकदिवसीय गोट प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरला. या बोकडाचे वजन तब्बल १५० किलो असून त्याची किंमत २० लाख रुपये आहे. हा बोकड दिवसाला ३ लिटर दूध पितो आणि मका, गहू असा त्याचा आहार आहे.
या बोकडाची शिंगे तब्बल १८ इंच लांब असून २५ वर्षांपूर्वी सानियन प्रजाती भारतात आणण्यात आली होती. मात्र, त्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने हा बोकड प्रदर्शनासाठी आणल्यावर विशेष काळजी घेतली जाते. थंड हवामानातील हा बोकड असल्याने सुरुवातीला कूलरमध्ये आणि नंतर पंख्याखाली ठेवण्यात येतो. या प्रदर्शनात या दुर्मिळ बोकडासाठी २० लाखांची बोली लावण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*