Industrialist-Madhukarrao-Mule-Passes-Away
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस, मराठवाडा साहित्य परिषदेचे (मसाप) विश्वस्त आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य तसेच प्रसिद्ध उद्योगपती मधुकरअण्णा मुळे यांचे आजारपणाने दुःखद निधन झाले. शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना ‘अण्णा’ या नावाने ओळखले जायचे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ते सदैव पुढे असायचे.
मधुकरअण्णा मुळे यांनी ग्रीन गोल्ड सीड्सच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले. तसेच, मसापच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची निर्मिती झाली. या नाट्यगृहासाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सहकार्याने निधी मिळवला होता.
महाराष्ट्र शासनाकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. शिक्षण, शेती आणि समाजकारण या क्षेत्रांत त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांच्या जाण्याने मराठवाड्यातील शिक्षण व साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*