KUMBH SPECIAL TRAIN DEPARTS TONIGHT
छत्रपती संभाजीनगर: कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे आज (२० फेब्रुवारी) संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून प्रयागराज आणि पाटणासाठी रवाना होणार आहे. भाविकांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आरक्षण पूर्ण भरले आहे. प्रतीक्षा यादी ३४० पेक्षा जास्त असून, प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
रेल्वे वेळापत्रक आणि प्रवासाचा तपशील
• रेल्वे २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून सुटणार.
• २२ फेब्रुवारी रोजी रात्री १.४५ वाजता छेवकी स्थानकावर आणि सकाळी १०.३० वाजता पाटणा येथे पोहोचणार.
• परतीचा प्रवास २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता पाटणाहून सुरू होईल.
• छत्रपती संभाजीनगर स्थानकावर रेल्वे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल.
एकूण १८८२ किमी प्रवास या विशेष रेल्वेने केला जाणार आहे.
तिकिटांचे दर
- स्लीपर क्लास: ₹७८५
- थ्री एसी: ₹२००५
- टू एसी: ₹२७८५
भाविकांसाठी ही रेल्वे मोठी सुविधा ठरणार असून, पुढील फेरीसाठीही मोठी मागणी आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*