छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या विरोधात संतापाची लाट पसरली असून, त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेने हर्सूल टी पॉईंट येथे कराडचा पुतळा जाळत निषेध नोंदवला.
मंगळवारी देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटो समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेमुळे समाजमन हेलावले असून, आरोपीला फाशी द्यावी, तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या आंदोलनात युवा सेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे, जिल्हाप्रमुख शिवाजी भागुरे, उपजिल्हा प्रमुख अर्जुन रेड्डी, तालुका प्रमुख अनिल जाधव यांच्यासह अनेक युवा सैनिक सहभागी झाले. “संतोष देशमुख यांचा अन्यायकारक व निघृण खून हा केवळ एका कुटुंबावर नाही, तर संपूर्ण समाजावर झालेला आघात आहे,” असे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. “वाल्मिक कराडला तत्काळ फाशी द्या,” असा एकमुखी नारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*