छत्रपती संभाजीनगर : उत्तरायणाला सुरुवात झाल्यानंतर दरवर्षी वेरूळ लेणी क्रमांक १० मधील चैत्यगृहात असलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीवर सूर्याची किरणे पायापासून चेहऱ्यापर्यंत पडतात. या नैसर्गिक प्रकाशमान घटनेला ‘किरणोत्सव’ असे म्हटले जाते. यंदा हा किरणोत्सव सोमवारी (१० मार्च) सायंकाळी ४.३० ते ५.१५ या वेळेत पर्यटक व अभ्यासकांना अनुभवता येणार आहे.
अभ्यासक व पर्यटकांची मोठी गर्दी अपेक्षित
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट अभ्यासक व पर्यटक किरणोत्सव पाहण्यासाठी वेरूळ येथे दाखल होणार आहेत. मूर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ. पाईकराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवसाच्या किरणोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी १० ग्रुपमध्ये अडीच हजारांहून अधिक अभ्यासकांनी नोंदणी केली आहे.
कसा असणार किरणोत्सव?
वेरूळ लेणी क्रमांक १० मधील चैत्यगृहाच्या समोरील कवडशातून (झरोका) संध्याकाळी ४.३० ते ५.१५ या वेळेत सूर्याची किरणे गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पडतात. पायापासून चेहऱ्यापर्यंत हळूहळू सरकणारा हा प्रकाश नैसर्गिक आश्चर्य असून, इतिहास अभ्यासक, स्थापत्य तज्ज्ञ आणि खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी तो संशोधनाचा विषय ठरतो.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा किरणोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातील अभ्यासक व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वेरूळ लेणी परिसरात चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*