छत्रपती संभाजीनगर: येथील बिडकीन औद्योगिक परिसरात आणखी आठ हजार एकर औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. ‘सीएमआयए’च्या (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर) बैठकीत ही घोषणा करताच उद्योजकांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिचे स्वागत केले.

फडणवीस म्हणाले, “संरक्षण उत्पादनासंदर्भात महाराष्ट्र पुढाकार घेणार आहे. छत्रपती संभाजीनगरात संरक्षण क्षेत्रातील अँकर प्रोजेक्ट आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करणार आहोत. इथले उद्योजक औद्योगिक विकासाबाबत सकारात्मक आणि उत्साही आहेत. हे शहर भविष्यात औद्योगिक मॅग्नेट होण्यासाठी सक्षम आहे.”

“आज कोणताही उद्योग नवीन ठिकाणी स्थापन करताना त्या ठिकाणची इकोसिस्टीम पाहतो, आणि छ. संभाजीनगरकडे ती इकोसिस्टीम आहे. पायाभूत सुविधा, उद्योगस्नेही वातावरण आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे इथे उद्योग उभा राहणे सोपे होते. टोयोटा-किर्लोस्करनेही कर्नाटकऐवजी इथल्याच सुविधा पाहून इकडेच थांबायचा निर्णय घेतला,” असे त्यांनी नमूद केले.

सध्या पुणे हे महाराष्ट्राचे प्रमुख औद्योगिक केंद्र मानले जाते. मात्र भविष्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे दोन्ही शहरं एकत्रितपणे राज्याचे नवे औद्योगिक मॅग्नेट ठरणार आहेत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

ही घोषणा औद्योगिक वर्तुळात आशावाद निर्माण करणारी ठरली असून, मराठवाडा क्षेत्राला औद्योगिक नकाशावर भक्कम स्थान मिळवून देणारी ठरू शकते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,253 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क