छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, सोमवार (२८ एप्रिल) रोजी पुन्हा एकदा पारा ४२ अंशांवर पोहोचला. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, या दिवशी शहराचे कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

एप्रिल महिन्यात आतापर्यंत पाचव्यांदा तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी ९ एप्रिल रोजी ४२.५, १७ आणि २५ एप्रिल रोजी ४२.४ तर २३ एप्रिलला ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

तापमानवाढीचा फटका शहरवासीयांच्या आरोग्यावरही जाणवू लागला असून, सौम्य उष्माघात, डिहायड्रेशनसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. तज्ज्ञांनी पुरेसे पाणी पिणे, हलक्या कपड्यांचा वापर करणे आणि शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

602 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क