छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात विजांच्या तडाख्यामुळे होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी वीज अटकाव यंत्रे बसवावीत, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, महिला व बालकल्याणाच्या योजना, आरोग्य, ऊसतोड कामगार आदी महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, महिला व बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्यासाठी विशेष तपासणी मोहीम

महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात “लाडकी बहीण” व तिच्या किमान पाच सहकाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी. यामध्ये गर्भाशय व स्तनाच्या कर्करोगासह अन्य आजारांची तपासणी होऊन उपचार उपलब्ध व्हावेत. तसेच औषध साठाही सुनिश्चित करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच – बॅड टच’ उपक्रम

शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच-बॅड टच’सारखे उपक्रम राबवले जावेत आणि पोलीस दीदी व पोलीस काका शाळांना वारंवार भेट देऊन निर्भय वातावरण निर्माण करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

ऊसतोड कामगारांसाठी योजनांचा लाभ देण्याचे आदेश

जिल्ह्यात एकूण २५,८१३ ऊसतोड कामगारांची नोंद आहे. या कामगारांसाठी कामगार विभाग, सामाजिक न्याय विभाग व इतर संबंधित विभागांनी समन्वय साधून त्यांच्यासाठीच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

दशसूत्री उपक्रमांतर्गत प्रभावी अंमलबजावणी

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण, आरोग्य, तांत्रिक कौशल्य, समुपदेशन व तक्रार निवारणासाठी उपक्रम राबवले जात असल्याची माहिती दिली.

या बैठकीत विविध विभागीय योजनांची माहिती व आढावा घेत जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य, शिक्षण, व श्रमिकांच्या हितासाठी प्रभावी निर्णय घेण्यात आले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

856 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क