छत्रपती संभाजीनगर : राज्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, नुकतीच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागभरातील १,३२९ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ४८८ महाविद्यालयांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया आणि महाविद्यालय पसंतीक्रम नोंदणी २१ मेपासून सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक माहितीपुस्तिका संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण ८३,६०० प्रवेश क्षमतेच्या जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना एक ते दहा या क्रमांकातच महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

• ३० मे: पहिली गुणवत्ता यादी जाहीर

• १ जून: गुणवत्ता यादीवर हरकती आणि दुरुस्तीचा अंतिम दिवस

• ३ जून: अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

• ५ जून: गुणवत्तेनुसार पहिल्या फेरीचे प्रवेश वाटप

• ६ जून: वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर जाहीर

• ६ ते १२ जून: निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक

• १४ जून: दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागांची यादी प्रसिद्ध

विद्यार्थ्यांनी वेळापत्रक लक्षात ठेवून आवश्यक त्या तयारीसह अर्ज प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

560 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क