छत्रपती संभाजीनगर :  – शहरात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून त्यामुळे अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. शिमला मिरची, कारले, फुलकोबी, पत्ताकोबी, मेथी आणि टोमॅटो यांचे भाव वाढले असून नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकरी बांधवांच्या भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी बाजारात फुलकोबीसह इतर भाज्यांची आवक घटल्याने दर वाढले आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत पावसाचा हा परिणाम भाजीपाल्याच्या किमतीवर जाणवण्याची शक्यता आहे.

सध्या काही भाज्यांचे दर स्थिर असले तरी बहुतेक भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. फळांमध्ये सफरचंद १२० रुपये, केसर आंबा १०० रुपये, द्राक्ष १५० ते २०० रुपये, अननस ६० ते ८० रुपये, ड्रॅगन फ्रूट १८० रुपये आणि चिकू ६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

बाजारातील सध्याचे प्रमुख भाजीपाला दर (प्रतिकिलो रुपये):

  • लसूण: १२० ते २००
  • शिमला मिरची: ८० ते १००
  • मेथी: २०
  • चुका/पालक: १० ते १५
  • गाजर: ३०
  • टोमॅटो: ५०
  • हिरवी मिरची: ५० ते ६०
  • दुधी भोपळा: २०
  • अद्रक: ४०
  • लिंबू: ४०
  • भेंडी: ४० ते ५०
  • कारले: ६०
  • कांदे: २० ते २५
  • गवार: ५० ते ६०
  • चवळी: ४० ते ५०
  • वांगी: ३०

आवक कमी आणि पावसाचा प्रभाव लक्षात घेता दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने गृहिणींना बजेट सांभाळताना अडचणींचा सामना करावा लागतोय.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

683 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क