छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यानासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २० वर्षांनंतर प्राण्यांच्या अदलाबदलीला मंजुरी दिली असून, लवकरच उद्यानात सिंहाची जोडी दाखल होणार आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयातून सिंहाची जोडी सिद्धार्थ उद्यानात आणली जाणार असून, त्याऐवजी येथून तीन वाघ शिवमोग्गाला दिले जाणार आहेत.

सिद्धार्थ उद्यान हे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय असून येथे वाघांच्या वाढत्या संख्येमुळे हे अदलाबदल सुलभ झाली आहे. उद्यानातील वातावरण वाघांच्या प्रजननासाठी पोषक ठरल्याने येथे वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज हजारो नागरिक व पर्यटक येथे वाघ, बिबट्या, हरण, सांबर, काळवीट, लाल माकड यांसारख्या प्राण्यांचे दर्शन घेतात.

सिंहाच्या अनुपस्थितीमुळे चिमुकल्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू हरवला होता. २००६ मध्ये शेवटचा सिंह मरण पावल्यानंतर सिंह पुन्हा आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, पिंजऱ्यांचा आकार लहान असल्याने केंद्रीय प्राधिकरणाने बंदी घातली होती. आता, प्राणिसंग्रहालयाचे स्थलांतर मिटमिटा येथे १५० एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या नव्या झूलॉजिकल सफारी पार्कमध्ये होणार असल्यामुळे ही बंदी हटवण्यात आली आहे.

या अदलाबदलीत सिंहासोबतच अस्वल आणि कोल्होबा देखील मिळणार आहेत. शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयानेही सहमती दर्शवली आहे. उपायुक्त विजय पाटील यांनी लवकरच प्राण्यांची अदलाबदल होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरच जंगलाचा राजा सिंह सिद्धार्थ उद्यानात पुन्हा एकदा गर्जना करणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

773 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क