छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र पैठण येथून संत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडीने आज बुधवार, १८ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. गोदाकाठी असलेल्या ओटा येथून पालखी भाविकांच्या गजरात आणि टाळमृदंगाच्या निनादात निघाली.

यंदाचा दिंडी सोहळा अत्यंत आगळावेगळा आहे. पहिल्यांदाच नाथांच्या पादुकांची पालखी १२० किलो शुद्ध चांदीच्या भव्य रथातून पंढरपूरकडे नेली जात आहे. या रथासाठी २१ लाखांची मजुरी असून सागवानी लाकडावर नक्षीकाम करून त्यावर चांदी चढवण्यात आली आहे. खासदार संदिपान भुमरे आणि पालखीप्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली होती.

प्रस्थानापूर्वी भाविकांना नाथांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. आमदार विलास भुमरे यांच्या सूचनेनुसार पालखी ओटा परिसरात स्वच्छतेचे काम मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम पैठण हद्दीतील चनकवाडी येथे आहे. यानंतर दिंडी क्रमशः हदगाव, कुंडलपारगाव, मुंगसवाडे, राक्षसभुवन, रायमोह, पाटोदा, दिघोळ आदी मार्गांवरून पंढरपूरकडे जाईल. पाच जुलै रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

“वेध पांडुरंगाच्या भेटीचे…” म्हणत वारकरी भक्तीभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले असून, पैठणची ही दिंडी वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा जिवंत अनुभव ठरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

335 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क