मुंबई – महाराष्ट्र सरकारने वाहनधारकांना दिलासा देत, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. राज्यातील लाखो दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक अजूनही HSRP बसवलेली नाहीत. ही मुदतवाढ ही सरकारची अंतिम संधी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
HSRP ही प्लेट वाहनांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व गाड्यांना HSRP बसवणे बंधनकारक आहे. या प्लेटमध्ये विशेष कोड, बारकोड व टॅम्पर प्रुफ वैशिष्ट्ये असल्यामुळे वाहन चोरी व बनावट नंबर प्लेटचा धोका कमी होतो.
गेल्या सहा महिन्यांत राज्यात केवळ २३ लाख वाहनांवरच HSRP बसवण्यात आली असून, अंदाजे २ कोटींपेक्षा जास्त वाहनधारक अजूनही या प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने अंतिम मुदतीत वाढ केली आहे.
तथापि, १५ ऑगस्टनंतर वाहनावर HSRP नसल्यास संबंधित वाहनधारकांविरोधात ₹१,००० ते ₹१०,००० पर्यंतचा दंड आकारण्यात येईल, तसेच RTO कडून वाहन सेवांवरही निर्बंध घातले जाऊ शकतात. मात्र, १५ ऑगस्टपूर्वी ऑनलाइन पोर्टलवरून अपॉइंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांवर तत्काळ कारवाई होणार नाही.
राज्यातील अधिकृत विक्रेत्यांकडूनच HSRP प्लेट बसवण्याचा सल्ला देण्यात आला असून, नागरिकांनी शक्य तितक्या लवकर अपॉइंटमेंट घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*